तिसऱ्या आघाडी तर्फे उरण विधानसभा मतदारसंघात संतोष काटे यांना उमेदवारी
- विरोधकांचे धाबे दणाणणार ; निवडणुकीत होणार काटे की टक्कर
- परिवर्तन महाशक्ती आघाडी तर्फे संतोष काटे यांना उमेदवारी
उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : आजपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांनाही सत्ता भोगली मात्र आजपर्यंत नागरिकांचे, गोर गरिबांचे मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राकडे विकासाची दृष्टी बघायला मिळत नाही.त्यामुळे गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनतेचे, नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली आहे. या आघाडीला जनतेतूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडी तर्फे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांची नावे सुद्धा जाहिर करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदार संघातही चूरशीचा सामना पहावयास मिळणार आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडी (तिसरी आघाडी )तर्फे उरण विधानसभा मतदार संघातून संतोष काटे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.जवळपास त्यांचे नाव निश्चित झाले आहे. संतोष काटे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )चे उलवे शहर अध्यक्ष आहेत.उरण विधानसभा मतदार संघात वर्षानुवर्षे अनेक समस्या, प्रश्न प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टीने व गोर गरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीने आपण परिवर्तन महाशक्ती आघाडी तर्फे उरण विधानसभा मतदार संघात आमदार पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संतोष काटे यांनी दिली आहे. संतोष काटे यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडी तर्फे निवडणूक लढविल्यास उरण विधानसभा मतदार संघात चुरशीचा सामना पाहवयास मिळणार आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, महायुती तर्फे भाजपचे महेश बालदी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रितम म्हात्रे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.महाविकास आघाडी व महायुतीच्या कारभारावर अनेक जनता नाराज आहे. या सर्व घडामोडी वर जनतेला तिसऱ्या आघाडीचा पर्याय खुला आहे. तिसरा पर्याय जनतेला योग्य वाटतो. जनतेनी ठरविले तर महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते. नागरिकांना आता तिसरा पर्याय योग्य वाटत असल्यामुळे दिवसेंदिवस परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवारांना जनतेचा पाठींबा वाढतच आहे. राज्यात कधीही राजकीय समीकरणे बदलत आहेत. त्याचा फायदा उरण विधानसभा मतदार संघात संतोष काटे यांना होण्याची दाट शक्यता आहे.