तुरळ ग्रामपंचायत कार्यालयात आधार नोंदणीसह केवायसी कॅम्प
रत्नागिरी : आधार केंद्र देवरुख यांच्यामार्फत संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे दि. १९ व २० जून २०२३ रोजी आधार केवायसी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
नवीन आधार क्रमांकासाठी नोंदणी, अस्तित्वात असलेले आधार अपडेट करणे तसेच आधार संदर्भातील बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी हा दोन दिवसीय कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
तुरळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच सहदेव विठ्ठल सुवरे, ग्रामविकास अधिकारी व्ही. के. राजेशिर्के, ग्रामपंचायतीचे सदस्य रामचंद्र हरेकर, सिद्धार्थ मोहिते, माजी सरपंच अरविंद जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रमेश डिके, गावातील अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
दिनांक 20 जून रोजी देखील हे शिबिर सुरू राहणार असल्याने या सेवेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.