दाओस येथून महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक आणू : ना. उदय सामंत

दाओस : दावोसहून विक्रमी गुंतवणूक राज्यात आणून लाखो तरुणांसाठी रोजगार निर्मिती केली जाईल, याची खात्री असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वित्झर्लंड दौऱ्यावर गेल्यानंतर दिली.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात विक्रमी क्रांती घडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ‘दावोस समिट’ (WEF2025) ला जाण्याची संधी मिळाली. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री म्हणून पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल ना. उदय सामंत यांनी धन्यवाद दिले.
मागील दोन वर्षांत केलेले विक्रमी सामंजस्य करार (MOU) याच प्रथेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढे सुरू राहतील, अशी ग्वाही देतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने दावोसहून विक्रमी गुंतवणूक राज्यात आणून लाखो तरुणांसाठी रोजगार निर्मिती केली जाईल, याची खात्री देतो.