महाराष्ट्र

दापोलीत २८ एप्रिलला समर सायकल स्पर्धा

  • राज्यभरातील नामांकित सायकलपटूंचा सहभाग

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन २०२४, सिझन ५ स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.

ही सायकल स्पर्धा १ ते ६० किमी अंतराची असून ३० व ६० किमी कोस्टल सिनिक रुट, शॉर्ट सिटी लूप, फन राईड अशा गटात होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शिवाय काही खास बक्षिसे पण असतील. ६० किमी सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते हर्णै, मुर्डी, आंजर्ले, आडे, उटंबर, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. ही स्पर्धा सकाळी पाच वाजता सुरु होईल. स्पर्धकांना ६ तासात ६० किमी अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, मेडिकल मदत असेल. शॉर्ट सिटी लूप मार्ग दापोली शहरातील ४ किमीचा असेल. फन राईड विनामूल्य असून सात वाजता सुरु होईल.

यासाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणी फॉर्म विनी इलेक्ट्रिकल फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल बाजारपेठ, राऊत सायकल वडाचा कोंड, परेश बुटाला जालगाव या ठिकाणी देऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ९०२८७४१५९५ हे आहेत. सर्वांनी आपल्या कुटुंबियांसमवेत सायकल चालवत यामध्ये सहभागी व्हा आणि तंदुरुस्त जीवनशैली अनुभवा असे आवाहन करण्यात आले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button