‘हरियाणा पॅटर्न’द्वारे सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार द्यावेत : भारतीय मजदूर संघाची कामगार मंत्र्यांकडे आग्रही मागणी

- रायगड जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचारी न्यायाच्या प्रतिक्षेत
उरण (विठ्ठल ममताबादे ) : दि २५ जून २०२५ रोजी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे कामगार मंत्री ऍड. आकाश फुंडकर यांची भेट घेऊन कामगारांना कंत्राटदारांच्या दलालगिरीतून मुक्त करून थेट रोजगार मिळावा यासाठी हरियाणा पॅटर्नद्वारे सर्व कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा, अशी ठाम मागणी केली आहे.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीत भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अनिल ढुमणे महामंत्री किरण मिलगीर, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ महामंत्री सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात, श्रीमती शर्मीला पाटील, हरी चव्हाण, राहुल बोडके, श्रीमती संजना वाडकर, श्रीमती मनिषा ढुमणे, मुंबई सचिव संदीप कदम, पालघर जिल्हा सचिव तेजस जाधव, तानाजी शिंदे,भारतीय मजदूर संघ संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ व घरेलू कामगार संघ पदाधिकारी, सुरक्षा रक्षक, ई – गवर्नर सोल्युशन प्रा लि चे कामगार पदाधिकाऱी व इतर पदाधिकारी व प्रतिनिधींनी महाराष्ट्र कामगार आयुक्त मा. तुमोड, उपसचिव श्री. कापडणीस , स्वीय सचिव रवींद्र धुरचड, संदेश कानडे कामगार उपायुक्त मुंबई ग्रामीण, संभाजी व्हनाळकर , ईतर कामगार विभाग वरिष्ठ अधिकाऱी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रसह रायगड जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कामगारांचे प्रश्न प्रलंबित असल्याने ते लवकर सुटावेत, अशी मागणी रायगड जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी केली आहे.