देवरूखमधील घनकचरा प्रकल्पाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ३० रोजी उदघाटन
देवरूख (सुरेश सप्रे ): देवरूख नगर पंचायतीने मोठा गाजावाजा केलेला सुमारे १.२५ कोटी खर्चून उभारलेल्या महत्वाकांक्षी घनकचरा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत याचे हस्ते व विविध मान्यवरांचे उपस्थितीत दि. ३० एप्रिल रोजी सायं. ५ वाजता सपंन्न होणार आहे.
तसेच नगर पंचायतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ हि पालकमंत्री यांचे हस्ते होणार आहे. त्यात २७ लाख रू. खर्चून बांधण्यात येणार्या नदीपलिकडील जिप शाळा न. २च्या दोन वर्गखोल्याचे व गणेश विर्सजन घाट कुंभारवाडी या कामांचे भूमिपूजन करणेत येणार आहे. तसेच नगरपंचायत परिसरात उभारलेल्या सोनचिरैया या शहर उपजिविका केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नाम. सामंत करणार आहे.
या सर्व कार्यक्रमा नंतर सायं ६ वा. नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मार्गदर्शन व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बांधकाम सभापती संतोष केदारी यांनी केले आहे.