देवरूखात महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१११ रक्तदात्यांनी केले रक्तदान
देवरूख (सुरेश सप्रे ) : पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख)व तालुका आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देवरूख पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी भरत चौगूले यांचे हस्ते करण्यात आले..
सर्वांच्या सहकार्याने व मदतीने घेण्यात आलेले महारक्तदान शिबिर अत्यंत यशस्वी झाले.पंचायत समितीकडील सर्व विभागांचेअधिकारी-कर्मचारी,
देवरूख गावातील व संगमेश्वर तालुक्यातील सर्व जबाबदार नागरिक यांनी सदर शिबिरास अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला.विशेष बाब म्हणजे आज जिल्हा ब्लड बँक रत्नागिरी यांच्याकडे 00 स्टॉक होता तो आपल्या सर्वांच्या रक्तदानामुळे तब्बल 111 पर्यंत जाऊन पोहोचला. जवळपास 30 ते 40 रक्तदात्यांना ब्लड बँकेची क्षमता संपल्यामुळे रक्तदान करता आले नाही त्या सर्वांनी येत्या कालावधीत ठिकठिकाणी होणाऱ्या रक्तदान शिबिरास रक्तदान करून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.