महाराष्ट्रलोकल न्यूज

दोन जिल्ह्यातील १४१७ शेतकऱ्यांना ८९६९ कलमे – रोपांचे वाटप

दापोलीतील नवभारत छात्रालय परिवार, अश्विनी ऍग्रो फार्म यांचा संयुक्त उपक्रम

संगमेश्वर दि. ३१ : कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवार आणि सौ. सुषमा आणि प्रा. प्रभाकर शिंदे यांचा अश्विनी ऍग्रो फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण आणि लांजा या पाच तालुक्यातील १७ गावांमधील आणि रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याच्या १२ गावांमधील एक हजार ४१७ शेतकऱ्यांना एकूण ४ लाख ३० हजार ९० रु. किंमतीच्या ८ हजार ९६९ कलम -रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही संस्था सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेली दहा वर्षे हा उपक्रम राबवित आहेत.

या वर्षीच्या पावसाळी हंगामातही नवभारत छात्रालय परिवारातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यातील २७ गावांमधील ६५१ शेतकऱ्यांना कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या पडवळ, कारली, भेंडी, शिराळी, काकडी आणि भोपळा या भाजीपाला पिकांच्या सुधारित जातींचे बियाणे मोफत पुरविले होते, ज्याचा फायदा अनेक शेतकरी कुटुंबाना झाला आहे.

मोफत कलमे रोपे वाटप उपक्रमाचा रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यामधून लाभ घेतलेल्या १२६७ शेतकऱ्यापैकी दापोलीतील सहा गावांमधील ४४०, खेड मधील तीन गावातील ३३०, मंडणगड मधील दोन गावातील १४७, चिपळूणच्या पाच गावांमधील ३५० आणि लांज्यामधील एका गावातून १०० शेतकरी समाविष्ट होते. तर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील बारा गावांमधून १५० शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा फायदा घेतला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील किरांबा, पालगड, पांगरी तर्फे हवेली, किन्हळ, देहेण, आणि सुकोंडी, खेड तालुक्यातील पिरलोटे, घाणेखुंट आणि गुणदे, मंडणगड तालुक्यातील तोंडली आणि आतखोल, चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली, परशुराम, नांदिवसे, रिक्टोली आणि तिवरे तर लांजा तालुक्यातील बेणी खुर्द खेरवसे या गावांचा समावेश होता. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील खांबेरे, टेमघर, सुडकोली, खुटल, खोपे, कोकबन, भागीरथी, खार, गोपालगड, कुडली, बाहे आणि देवकाने ही गावे समाविष्ठ होती.

या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील देहेण आणि सुकोंडी ही गावे सोडून इतर गावांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला चार कोकम रोपे, दोन काळीमिरी रोपे आणि दोन वर्षाचे एक चिकू कलम मोफत पुरविण्यात आले. तर देहेण आणि सुकोंडी मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दोन वर्षाचे एक आंबा कलम, एक चिकू कलम आणि दोन काजू रोपे मोफत पुरविण्यात आली. रायगड जिल्यातील बारा गावांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दोन वर्षाची तीन आंबा कलमे आणि तीन चिकू कलमांचे मोफत वाटप करण्यात आले.

मोफत पुरविण्यात आलेल्या ८९६९कलमा रोपांमध्ये ४२६८कोकम रोपे, २३३४ काळीमिरी रोपे, १६६७ दोन वर्षाची चिकू कलमे, ५०० दोन वर्षाची आंबा कलमे आणि २०० काजू रोपे यांचा समावेश होता. यापैकी एकूण रु. १,९९, ३०० किंमतीची ४२६८ कोकम रोपे, ६३० चिकू कलमे, १०० आंबा कलमे आणि २०० काजू रोपे नवभारत छात्रालय परिवाराच्या कृषि केंद्रामधून पुरविण्यात आली, तर एकूण रु. २, ३०, ७९०किंमतीची २३३४ काळीमिरी रोपे, ४०० आंबा कलमे, आणि १०३७ चिकू कलमे अश्विनी ऍग्रो फार्म मधून पुरविण्यात आली.

मोफत कलमे-रोपे वाटप करण्यासाठी सर्व गावांमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संस्थेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच फळझाडांच्या लागवडीविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले आणि लागवडीचे अर्थशास्त्रही पटवून दिले.

मोफत कलमे रोपे वाटप करण्यासाठी संस्था आणि गावातील पदाधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय राखण्यामध्ये आणि अंमलबजावणी मध्ये अनेक व्यक्तींनी परिश्रम घेतले. त्यामध्ये चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्ती सौ. श्रद्धा रेडीज, चिपळूण पंचायत समितीमध्ये उमेद कार्यक्रमांतर्गत कार्यरत प्रभाग समन्वयक सौ. गौतमी दिंडे पाटणे, कृषि महाविद्यालय, दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे आणि ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमातील कृषि कन्या, कुणबी समाजोन्नत्ती संघाच्या मंडणगड शाखेचे अध्यक्ष दिनेश सापटे, डॉ. बासाकोकृवि सेवानिवृत्तांची जनसेवा समितीचे अध्यक्ष राजाराम मडव, रोहा येथील बिजामृत शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक गणेश भगत, कुणबी सेवा संघ, लांजा चे अध्यक्ष शांताराम गाडे आणि नवभारत छात्रालय, दापोलीचे माजी विद्यार्थी दिनेश राणे, विश्वनाथ तांबडे आणि सुनील गुरव यांचा समावेश होता.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कलमे – रोपे पुरविणे, कलमे -रोपे वाटप आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, ही सर्व कामे अत्यंत नियोजन पूर्वक करण्याचे काम कुणबी सेवा संघांचे सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर यांनी केले, त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.

कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर, खजिनदार प्रदीप इप्ते, सदस्य प्रभाकर तेरेकर, चंद्रकांत मोहिते, दिनेश राणे, सुरेश लोखंडे, शिवप्रसाद चौगुले यांनी परिश्रमपूर्वक या समजोपयोगी कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. सर्वच गावातील पदाधिकारी, शेतकरी आणि महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि दोन्ही संस्थांना धन्यवाद दिले. विशेषतः कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे आणि अश्विनी ऍग्रो फार्मसच्या सौ. सुषमा शिंदे आणि राजकिरण शिंदे यांचे मनापासून आभार मानले. या सर्वांनी वाटप केलेल्या कलमा रोपांची योग्य प्रकारे लागवड करू, त्यांची निगालो राखू आणि संस्थेचे ऋण फेडू अशी ग्वाही दिली.

कुणबी सेवा संघांचे कर्मचारी सुनील ठाकूर, सौ. वर्षा गोरीवले, सौ. स्वाती विचले, सौ. रेणुका शिंदे, सौ. कीर्ती घाग, सुजित गोलांबडे, श्री. समीर शिबे, सौ. रिया पागडे, श्रीमती सुवर्णा अबगुल आणि सौ. मानसी मुलुख यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button