नगरसेविका रेश्मा किर्वे यांनी सोडवला देवरुख कुंभारवाडीचा पाणी प्रश्न

देवरूख (सुरेश सप्रे) : देवरुख नगर पंचायत प्रभाग क्र.3 मधील भाजपा नगरसेविका सौ.रेष्मा किर्वे यांनी पुढाकार घेत देवरुख कुंभारवाडी येथील नागरिकांना भडसावत असलेला पाण्याचा प्रश्न सोडवत दिलासा दिला.
कुंभारवाडीतील नागरीकांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावत होती. त्यासाठी सौ. किर्वे यांनी पुढाकार घेत २वर्षा पुर्वी खालची कुंभार वाडी येथे बोरवेल मारुन दिली होती. आता वरची कुंभार वाडी भोरपवणे येथे बोरवेल मारून पाण्याचा प्रश्नकायम स्वरूरी सोडवला आहे.

यांचबरोबर गेल्येवाडी. तांबळवाडी, तेलीवाडी येथे ज्येष्ठ नागरीकांना बसण्यासाठी बेचेस (बाकडी) स्वखर्चाने बसवुन दिली आहेत. आपल देवरूख स्वच्छ देवरूख च्या संकल्पनेच्या बैठका आपल्या वार्डात चांगल्या प्रकारे घेवून स्वच्छतेचे महत्व पटवून देिले. त्याला नागरीक चांगला प्रतिसाद देत स्वच्छता मोहीम यशस्वी करत आहेत. सौ. किर्वे यांनी केलेल्या लोकोपयोगी कामामुळे वार्डातील नागरीक समाधान व्यक्त करीत आहेत.

वार्ड ३ मधील सदरच्या दोन्ही कार्यक्रमाला नगराध्यक्ष सौ.मृणाल शेटये, मुकंद जोशी ,अभिजीत शेटये,.तुकाराम किरवे. आदी मान्यवरांसह वार्डातील ग्रामस्थ उपस्थित होते.