नेत्रावती एक्सप्रेसमध्ये सापडलेली सोनसाखळी मुख्य तिकीट निरीक्षक राऊळ यांनी केली पोलिसांकडे जमा !

रत्नागिरी : कोकण रेल्वेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक पदावर काम करीत असलेले श्री. विठोबा राऊळ ऊर्फ माऊली यांनी आज (१६३४६) मुंबईकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस या गाडीत कार्यरत असताना त्यांना सापडलेली साधारणपणे अडीच ते तीन ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी त्यांनी रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केली.
श्री. विठोबा राऊळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या पिंगुळी येथील संत परमपूज्य श्री. राऊळ महाराज यांचे चिरंजीव आहेत. कोकण रेल्वेत तिकीट निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. आपल्या सेवाकाळात त्यांनी प्रामाणिक सेवा केली आहे. आज नेत्रावती एक्सप्रेसमध्ये सेवा बजावत असताना श्री. विठोबा राऊळ यांना एका बोगीमध्य सोन्याची साखळी आढळून आली त्यांनी ती साखळी रत्नागिरी येथे आर पी एफ कॉन्स्टेबल श्री.अनंत सुहारे, यांच्याकडे सुपूर्द केली आहे. श्री. विठोबा राऊळ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
ज्या कुणा प्रवाशाची ही साखळी असल्यास त्याने किंवा तिने संबंधित विभागातून आपली ओळख दाखवून साखळी आपलीच असल्याचे दस्तऐवज दाखवून घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. विठोबा राऊळ ऊर्फ माऊली यांच्या प्रामाणिकपणाचे संपूर्ण कोकण रेल्वे परिवारातही कौतूक होत आहे.