पत्रकार नवनाथ बन भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश माध्यम प्रमुखपदी
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ययांची घोषणा
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश माध्यम विभाग प्रमुखपदी पत्रकार नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री. बन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये श्री. बन यांनी रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला.
गेल्या १५ वर्षांपासून श्री. बन हे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. दैनिक गावकरी पासून त्यांच्या पत्रकारितेतील कारकीर्द सुरु झाली. मराठवाडा नेता या वृत्तपत्रांत तसेच एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये त्यांनी काम केले. विद्यार्थी दशेत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले. श्री. बन यांना माध्यम क्षेत्राचा मोठा अनुभव असून, भारतीय जनता पार्टीची धोरणे, विचारधारा सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम ते करतील, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले आहे.