पाणजे गावाला मिळालं विद्युत रोषणाईने चमकणारं बोधचिन्ह!
- गावाच्या नवीन नामफलकाचा अनावरण कार्यक्रम सोहळा झाला मोठ्या उत्साहात संपन्न
उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : ‘माझा गाव माझा अभिमान’ या संकल्पने अंतर्गत उरण तालुक्यातील पाणजे गावाला विद्युत रोषणाईने चमकणारं बोधचिन्ह नुकतंच मिळालं आहे.
आज काल शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावंच्या – गावं उध्वस्त केली जात आहेत.आणि हे सर्व पाहता ” माझा गाव माझा अभिमान ” ही संकल्पना उराशी बाळगत आजपर्यंत उरण, पनवेल तालुक्यातील अनेक गावांना त्यांच्या गावांच्या नावांचे बोधचिन्ह अर्थात विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नावांचे नवीन नामफलक बनवून देण्याचं औदार्य ज्यांच्या मनाच्या मोठेपणातून साकारलं गेलं असे दानशूर व्यक्तिमत्त्व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्परुपी औदार्यातून आज उरण तालुक्यातील पाणजे गावात पाणजे या नावाचं विद्युत रोषणाईने चमकणारे नामफलक बनऊन देण्यात आला.
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सौजन्याने साकारलेल्या पाणजे ह्या गावांत नवीन नामफलकाच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी या कार्यक्रमा प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली होती ती महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध निवेदक,समालोचक सुनिल जी वर्तक,गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे अध्यक्ष हिराचंदजी म्हात्रे वेश्वी गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते विनोददादा पाटील आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत, पाणजे गावचे सरपंच लखपती पाटील, माजी सरपंच भालचंद्र पाटील, ग्रा.पं.सदस्य हितेश भोईर करिश्मा पाटील, प्राची पाटील,धनश्री भोईर, प्रभाकर पाटील माजी उप सरपंच रमेश पाटील, ग्रामसेविका समीक्षा ठाकूर आणि सुनिल पाटील,शांताराम पाटील, हेमंत,पाटील,विश्वनाथ पाटील,योगेश पाटील,जगदीश भोईर, विद्याधर भोईर,राजेश भोइर, आशा भोईर, मोनिका भोईर, जयश्री पाटील सोबतच पाणजे गावांतील ग्रामास्थ आणि महिला भगिनिंच्या मोठ्या उपस्थितीत या विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नवीन नामफलकाचा अनावरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.