पाणजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हितेश भोईर यांची बिनविरोध निवड

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पाणजे गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कट्टर कार्यकर्ते हितेश एकनाथ भोईर यांची पाणजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
गावच्या विकासासाठी रात्रं दिवस धडपणारे, प्रेमळ व्यक्तिमत्व लोकांच्या अडीअचणीला धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. गावातील अनेक प्रश्नांना, समस्यांना त्यांनी न्याय दिला आहे. गावातील गटारे, नाले सफाई, पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विविध समस्या मार्गी लावल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड पाणजे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच लखपती पाटील, माजी उपसरपंच विलास पाटील, ग्रामसेविका समीक्षा ठाकूर, सदस्या करिष्मा पाटील, सदस्या प्राची पाटील, ग्रामपंचायतचे इतर सदस्य,गावातील जेष्ठ मंडळी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त उपसरपंच हितेश भोईर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.