पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विविध विकास कामांचे रविवारी भूमिपूजन
रत्नागिरी, दि.15 : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
रविवार 17 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 1.15 शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता रत्नागिरी न.प. हद्दीतील प्रभाग क्रं.6 मधील विश्वनगर येथील गार्डन विकसित करणे (वैशिष्ट्यपूर्ण) विकासकामाचे भूमिपूजन (स्थळ: विश्वनगर, रत्नागिरी) दुपारी 2.45 वाजता रत्नागिरी न.प. हद्दीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहाच्या पाठीमागील खाऊगल्ली विकसित करणे (वैशिष्ट्यपूर्ण) विकासकामाचे भूमिपूजन (स्थळ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या पाठीमागे) दुपारी 3.30 वाजता रत्नागिरी न.प. हद्दीतील जिजामाता गार्डन शेजारील खाऊगल्ली विकसित करणे तसेच जिजामाता उद्यान सुशोभिकरण करणे (संभाजी महाराज स्मारक उभारणे) (वैशिष्ट्यपूर्ण आणि नगरोत्थान) विकासकामाचे भूमिपूजन. (स्थळ : थिबा पॅलेस, उद्यान) दुपारी 4.15 वाजता रत्नागिरी न.प. हद्दीतील ध्यान केंद्राचे बांधकाम करणे (नगरोत्थान) विकासकामाचे भूमिपूजन (स्थळ : संसारे गार्डन, रत्नागिरी) सायंकाळी 5 वाजता रत्नागिरी न.प. हद्दीतील तारांगण शेजारील शिर्के उद्यानाचे सुशोभिकरण करणे (विठ्ठल मूर्ती उभारणे) (नगरोत्थान) विकासकामाचे भूमिपूजन (स्थळ : माळनाका, शिर्के उद्यान ) सायंकाळी 5.45 वाजता रत्नागिरी नगरपरिषद शॉपिंग सेंटर (आठवडी बाजार) विकसित करणे व बा. ना. सावंत रोड येथील नविन भाजी मार्केट विकसित करणे
(वैशिष्ट्यपूर्ण) विकासकामांचे भूमिपूजन (स्थळ : आठवडा बाजार ) सायंकाळी 6.30 वाजता रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्ते काँक्रीटीकरण करणे (एकूण रस्ते 11) (नगरोत्थान) विकासकामाचे भूमिपूजन (स्थळ: साळवी स्टॉप) सायंकाळी 7.15 वाजता रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील मंजूर नगररचना योजना क्र.2 मधील आरक्षण क्रमांक 62 मधील प्ले ग्राऊंड विकसित करणे व आरक्षण क्र. 17 येथे स्विमिंग पुल व उद्यान विकसित करणे (वैशिष्ट्यपूर्ण) विकासकामांचे भूमिपूजन (स्थळ : तेली आळी) रात्रौ 8 वाजता खालची आळी मित्र मंडळ मार्गशिर्ष गणपती उत्सवास उपस्थिती (स्थळ : खालची आळी) रात्रौ 8.30 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने साडवली, ता. संगमेश्वर, कडे प्रयाण. रात्रौ 9.30 वाजता मा. ना. श्री. उदयजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन यांचे मान्यतेने शिवसेना संगमेश्वर तालुका व श्री. सचिन मांगले मित्रमंडळ आयोजित नामदार चषक कबड्डी लिग स्पर्धा येथे सदिच्छा भेट (स्थळ : एव्हरेस्ट सर्व्हिसिंग सेंटर शेजारी, साडवली, ता.संगमेश्वर) रात्रौ सोईनुसार साडवली, ता. संगमेश्वर येथून मोटारीने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक कडे प्रयाण. मध्यरात्रौ 12 वाजता संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक येथे आगमन व कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.