प्रकल्पग्रस्त भुमिपुत्रांच्या समर्थनार्थ भारत मुक्ती मोर्चाची जाहीर सभा
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील भेंडखळ गावात BPCL कंपनी प्रशासनाच्या मनमर्जी कारभाराविरोधात येथील प्रकल्पग्रस्त तरुणांनी भेंडखळ BPCL प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून 17 ऑक्टोबर 2022 पासून म्हणजेच गेल्या 117 दिवसापासून साखळी उपोषण आंदोलन सुरु असून दरम्यान च्या काळात या आंदोलनाची स्थानिक प्रशासन आणि BPCL प्रशासन यांनी कुठलीच दखल घेतली नाही. या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनांनी आंदोलनाला जाहीर समर्थन दिले.
प्रकल्पग्रस्त तरुणांच्या आग्रहावरुन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या आंदोलनाच्या समर्थनात जाहिर सभा घेण्याचा निर्णय घेतला असून हि जाहिर सभा रविवार दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारि 04.00 वाजेपासून P. N. P. माध्यमिक विद्यालय मैदान, भेंडखळ येथे होणार आहे.
या सभेची सपूर्ण तयारी झाली असून आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साह संचारला आहे. सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भेंडखळ BPCL प्रकल्पग्रस्त समिती, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुलनीवासी बहुजन कर्मचारी संघ तथा भेडखळ ग्रामस्थ मंडळाने केले आहे.