महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
दरड कोसळलेल्या अणुस्कुरा घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

रत्नागिरी : पावसामुळे दरड कोसळून वाहतूक बंद पडलेल्या आणि राजापूर कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटातील घटनास्थळाला रविवारी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आज बैठकीद्वारे आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी अनुस्कुरा घाटामध्ये रस्त्यावर दरड कोसळलेल्या ठिकाणास भेट देऊन पाहणी केली व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या तसेच अन्य धोकादायक ठिकाणांचीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.