मुंबईतील ‘मेगाब्लॉक’मुळे नेत्रावती एक्सप्रेस पनवेलपर्यंतच धावणार !

रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या हद्दीत ठाणे तसेच दिव रेल्वे स्थानकादरम्यान टीडब्लूएस पाईंट बदलण्याच्या कामासाठी घेणात येणार्या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वेमार्गे धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस दोन दिवसांसाठी निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहे.
या बाबत कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईत ठाणे-दिवा दरम्यान रेल्वे मार्गावरील कामासाठी दि. 24 नोव्हेंबर 2024 रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे तिरुअनंतरपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस (16346) दरम्यान धावणारी दि. 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रवास सुरु होणारी नेत्रावती एक्स्प्रेसलाच थांबवण्यात येईल. पनवेल ते लो. टिळक टर्मिनस दरम्यान या गाडीचा प्रवास रद्द केला जाईल.
याचबरोबर दि. 24 रोजी लो. टिळक टर्मिनस येथून तिरुअनंतरपुरमसाठी सुटणारी डाऊन नेत्रावती एक्स्प्रेस (16345) लो. टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल येथून प्रवासासाठी निघणार आहे.
या दिवशी नेत्रावती एक्प्रेसने प्रवास करणार्या प्रवाशांनी या बदलाचाी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.