महाराष्ट्रराष्ट्रीयलोकल न्यूज
बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात मूकमोर्चा
सिंधुदुर्ग नगरी : बांगलादेश येथील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, ओरोस सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काल ( मंगळवारी ) मूकमोर्चा काढण्यात आला. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चामध्ये सहभागी होऊन सकल हिंदू बांधवांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा कडाडून निषेध केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाभरातून सकल हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.