महाराष्ट्र
बारसू रिफायनरीसंदर्भात पालकमंत्री सामंत यांनी घेतली आढावा बैठक
रत्नागिरी दि २९ : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
यावेळी खासदार विनायक राऊत, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री.प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, राजापूर उपविभागीय अधिकारी वैशाली माने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे आदी उपस्थित होते.