महाराष्ट्रशिक्षण

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

रत्नागिरी,दि. १० : सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२वी ) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरशुक्रवार दि. १० जानेवारी रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध झाली आहेत.

सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक
शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मंडळाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १०/०१/२०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक
शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket ) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०१५ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ. महाविद्यालयांनी इ.१२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
प्रवेशपत्र (Hall Ticket ) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे
शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
ज्या आवेदनपत्रांना “Paid” असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे “Paid Status Admit
Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “Extra Seat No Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
Download केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव / आईचे नाव / जन्मतारीख अशा दुरुस्त्या असल्यास सदर दुरूस्त्या Online पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता Application Correction ही Link उपलब्ध करून देण्यात आलेली असून विहित दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व
विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर “Correction Admit Card ” या Link व्दारे सुधारीत Admit
Card उपलब्ध होतील. विषय / माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात.
या आवेदनपत्रांना “Paid ” असे Status प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होवून “Late Paid Status Admit Card” या Option व्दारे त्यांची प्रवेशपत्रे
उपलब्ध होतील.
फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे..
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
तरी फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र. (इ. १२ वी) परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button