महाराष्ट्रलोकल न्यूज
बिरमणीमधील स्थलांतरित कुटुंबांना प्रत्येकी १० किलो गहू व तांदूळ वाटप
रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : खेड तालुक्यातील बिरमणी येथील 10 स्थलांतरित आदिवासी कुटुंबांना 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी दिली.
या 10 कुटुंबांपैकी 4 कुटुंबांना शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तर उर्वरित 6 कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाले आहेत. 10 कुटुंबांमध्ये 28 व्यक्तींचा समावेश आहे.