बेळगाव येथे १५ डिसेंबर रोजी माजी सैनिकांचा मेळावा
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/11/images-2024-11-27T175717.909.jpeg)
रत्नागिरी, दि. 27 : मराठा लाईट इन्फेन्ट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील शिवाजी स्टेडियम येथे १५ डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते दु. 4 वाजता माजी सैनिक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात पेन्शन, मेडिकल व स्पर्श (SPARSH ) विषय व इतर अभिलेख विषयी अडचणी असल्यास या मेळाव्यात सहभागी होऊन अडी-अडचणींचे निरसन होणार आहे. त्याकरिता आपल्या सोबत PPO, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. तसेच, डिर्चाज बुक PART II ORDER च्या कॉपी (असल्यास) पॅन कार्ड, ECHS कार्ड, कॅन्टीन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र घेऊन या मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हयातील जे माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा / अवलंबित सदर मेळाव्यात अडी-अडचणी सोडविण्यासाठी जाण्यास उत्सुक आहेत. अशा व्यक्तीनी आवश्यकता व्यवस्थेसाठी Whatsup No -८३१७३५०५८४ संपर्क साधावा तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ७२१८४९८६२७ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.