महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूज

भारतीय सेनेच्या सन्मानार्थ उरणमध्ये काँग्रेसची भव्य तिरंगा रॅली

उरण (विठ्ठल ममताबादे ) : भारतीय सेनेच्या सन्मानार्थ उरणमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उरण शहर काँग्रेस कार्यालयात
राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून
तिरंगा रॅलीला सुरुवात झाली.

महेंद्रशेठ घरत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. ‘भारत माता की जय’ ‘वंन्दे मातरम’,’भारतीय सैनिकांचा विजय असो’ च्या जयघोषात रॅली पुढे उरण शहरात फिरली.

या रॅलीत सर्वसामान्य नागरिक स्वत:हून सहभागी झाले होते.या रॅलीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. समारोप प्रसंगी रॅलीला संबोधन करताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, “देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सेनेची आजपर्यंतची कामगिरी अतुलनीय आहे. भारतीय लष्कर मजबूत होण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुमारे ४५ वर्षांपूर्वी म्हणजे १९८३ मध्ये ‘इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोगाम’ सुरू केला.१९८५ मध्ये कमी पल्ल्याच्या अतिवेगवान क्षेपणास्त्रांची पहिली चाचणी केली. राजीव गांधींनी क्षेपणास्त्र विकासावर भर दिला. त्यामुळेच पुढे त्रिशूल, पृथ्वी, नाग, अग्नी आणि आकाश या क्षेपणास्त्रांची निर्मिती झाली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी सर्व वरिष्ठ सेनाधिकारी यांचा नकार असतानाही लष्करात महिलांना प्राधान्यांने सामावून घेण्याचे आदेश दिले, हा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या कुरापतीला भारतीय सैनिकांनी चोख प्रतुत्तर दिले. याचा भारतीय म्हणून आम्हांस अभिमान आहे, म्हणूनच भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी आजची तिरंगा रॅली काढण्यात आली आहे.”

या तिरंगा रॅलीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, महिला तालुका अध्यक्ष रेखा घरत, शहर महिला अध्यक्ष अफशा मुकरी, शहर अध्यक्ष गुफरान तुंगेकर,आयाज फकी, जयवंत पाटील, संजय ठाकूर,दिपक ठाकूर, गोपीनाथ मांडीळकर, भालचंद्र घरत प्रेमनाथ ठाकूर,हेमंत ठाकूर, प्रमोद ठाकूर,वैभव पाटील,लंकेश ठाकूर, ध्रुव पाटील, केतन पाटील, तेजस पाटील, सदानंद पाटील, विनया पाटील,निर्मला पाटील,प्रतीक्षा पाटील, अमिना पटेल, जयवंती गोंधळी, जगदीश घरत, प्रफुल घरत, अशोक ठाकूर,आदित्य घरत, श्रीयश घरत, विनोद पाटील,घनश्याम पाटील, आनंद ठाकूर, विवेक म्हात्रे, किरण कुंभार, अरुण म्हात्रे, जितेश म्हात्रे, रमेश टेमकर, दत्ता म्हात्रे, अशोक ठाकूर,आदी काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button