भेंडखळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सालाबादप्रमाणे तिथीनुसार फाल्गुन कृष्ण तृतीया म्हणजेच शिवजयंयी उत्सव.ही शिवजयंती पुष्पा-परशुराम प्रतिष्ठान व आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने भेंडखळमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . सदर कार्यक्रमास शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना ) रायगड उपजिल्हा प्रमुख अतुल भगत तसेच भेंडखळ गावाच्या उपसरपंच संगीता मेघ: श्याम भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष वैभव भगत, भेंडखळ शिवसेना शाखाध्यक्ष राहुल भगत तसेच मंडळाचे सचिव जय भगत, खजिनदार राकेश भगत व भेंडखळ ग्रामस्थ तसेच महिला वर्ग यावेळी उपस्थित होते. पुष्पा-परशुराम प्रतिष्ठान व आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिवजयंती निमित्त विविध उपक्रमास जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.