मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षांसोबत बैठक
रत्नागिरी, दि. 25 (जिमाका):- मतदान केंद्रात झालेले बदल, नवीन प्रास्तावित मतदान केंद्र, नावात बदल केलेली मतदान केद्र, मतदारांचे समायोजन केलेली मतदान केंद्रे आदी मतदान केंद्राच्या सुसुत्रीकरणाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज राजकीय पक्षांची बैठक घेऊन माहिती दिली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, परशुराम ढेकणे, हारीस शेकासन, राहूल पंडित, अद्वैत कुलकर्णी, परेश साळवी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी माहिती दिली. 263 दापोली मतदार संघात मतदान केंद्रातील मतदारांना मतदान केंद्रापासून चे अंतर 3 कि.मी. पेक्षा जास्त असल्याने 5 ठिकाणी नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे याआधी 1710 मतदान केंद्रं होती ती आता 1715 होतील. तसेच मतदान केंद्राच्या स्थळात बदल झालेल्या 24 मतदान केंद्र, नावात बदल झालेल्या 81 मतदार केंद्र आणि समायोजन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सविस्तर माहिती दिली.