मत्स्यव्यवसाय आयुक्त मुंबई पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सर्यवंशी यांच्याकडे

मुंबई : आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत डॉ. डी. एन. सर्यवंशी (भाप्रसे), विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश निर्गमित केले आहेत.
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून २३ जानेवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई या पदाचा कार्यभार श्री. प्रदीप पी. (भाप्रसे) यांच्याकडे होता.हा आदेश सहसचिव सुभाष उमरणीकर यांनी जारी केला असून, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
हा आदेश सहसचिव सुभाष उमरणीकर यांनी जारी केला असून, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.





