‘मविआ’मुळे राज्याच्या विकासात बाधा : चंद्रशेखर बावनकुळे

- माजी क्रिकेटपटू केदार जाधव तसेच मनसे, काँग्रेस, उबाठाच्या कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश
मुंबई : काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी या तीन पक्षांमुळे महाराष्ट्राच्या विकासात बाधा येत आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत श्री.बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते.
ओबीसी कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, खा. अशोक चव्हाण, आ. अतुलबाबा भोसले, आ. समाधान आवताडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस संदीप गिड्डे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
यावेळी सातारा, कराड, हिंगोली, नांदेड, वसमत येथील काँग्रेस, सांगली येथून मनसे, कॉंग्रेस आणि उबाठा शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला. श्री बावनकुळे आणि श्री. चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.