महाराष्ट्रराजकीय
महायुती राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध

- मुंबईतील समन्वय समितीच्या बैठकीत
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रवासीयांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार करण्यात आला.
महायुतीची समन्वय समिती बैठक महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी संपन्न झाली.

या बैठकीस महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संदिपान भुमरे, खासदार सुनील तटकरे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटील, भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.