महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या संध्याकाळी शपथविधी सोहळा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ उद्या दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आझाद मैदान,मुंबई येथे होणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार सरकार स्थापन करणार यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर मागील अनेक दिवस मुख्यमंत्री पदावरील चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे यावर चर्चा महाचर्चा, बैठका झाल्या आणि आता दिनांक 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे स्पष्ट झाले.
दरम्यान, फडणवीस अजित पवार यांच्यासोबत आणखी कोण कोण शपथ घेणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.