ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय
महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढवण्यावर भर देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी आमदार अतुल सावे, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सचिव प्रवीण पुरो, महाराष्ट्र माहिती महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.