महाराष्ट्र हादरला.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

- दुर्घटनाग्रस्त विमानातील अजित पवारांसोबतच्या इतर पाच जणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान बारामतीजवळ दुर्घटनाग्रस्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयच्या (PTI) हवाल्याने दिले जात आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार मुंबईहून बारामतीकडे खासगी चार्टर्ड विमानाने (Private Chartered Plane) रवाना झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला जात होते. या विमानात अजित पवारांसह त्यांच्या टीमचे एकूण ७ सदस्य होते.
अपघाताची महत्त्वाची माहिती:
- ठिकाण: बारामती विमानतळाजवळ.
- प्रवासी: एकूण ७ जण (अजित पवार आणि त्यांचे कर्मचारी).
- अपघात : प्राथमिक अहवालानुसार ४ जणांचा मृत्यू.
- कारण: तांत्रिक बिघाड की क्रॅश लँडिंग, याचा तपास सुरू आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर
विमान कोसळल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.





