मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचा गौरव आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण संस्थेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तिरंगा फडकवल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून सर्वांनी संविधानाप्रती निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता गोड मिठाई वाटून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह आणि देशाभिमान दिसून आला.
या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे , संस्थेच्या संचालिका मा. सौ. अंजलीताई तानाजीराव चोरगे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





