जगाच्या पाठीवरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हलसायन्स & टेक्नॉलॉजी

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: प्रगतीचा वेग आणि ताजे अपडेट्स!

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद या भारताच्या पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत अनेक महत्त्वाचे टप्पे पूर्ण होत आहेत, तर काही ठिकाणी आव्हानांचा सामनाही करावा लागत आहे.

ताज्या घडामोडी

  • स्टील पुलांची उभारणी: गुजरातमध्ये डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFCC) ट्रॅकवर १०० मीटर लांबीचा आठवा स्टील पूल नुकताच पूर्ण झाला आहे. हा पूल तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली कारखान्यात तयार करण्यात आला असून, त्याचे वजन सुमारे ६०० मेट्रिक टन आहे. एकूण २७ स्टील पूल या प्रकल्पांतर्गत उभारले जाणार आहेत.
  • महाराष्ट्रातही कामाला गती: गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट वेगाने सुरू आहे. डहाणू येथे ४० मीटर लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे. महाराष्ट्रात १५६ किमीचा ट्रॅक बांधला जाईल, ज्यामध्ये ५० किमी उन्नत मार्ग असेल.
  • भूमिगत स्टेशनचे काम :  मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील देशातील पहिले भूमिगत बुलेट ट्रेन स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. या स्टेशनच्या खोदकामाचे सुमारे ७६% काम पूर्ण झाले असून, स्टेशनच्या भिंती बांधण्याचे काम सुरू झाले आहे.
  • चायनामुळे अडथळा? बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेल्या दोन टनेल बोरिंग मशीन (TBM) चीनमधील बंदरात अडकल्याने भुयारी मार्ग उभारणीच्या कामात थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे शाफ्ट बांधकामांवरही परिणाम होऊ शकतो.
  • स्टेशन प्रगती: ठाणे, विरार आणि बोईसर यांसारख्या महाराष्ट्रातील प्रमुख स्थानकांवरही बांधकाम वेगाने सुरू आहे. या स्थानकांच्या पायाभरणीपासून ते स्ट्रक्चरल कामांपर्यंत विविध टप्पे पूर्ण होत आहेत.
    प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
  • अंतर आणि वेळ: मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा ५०८ किलोमीटरचा प्रवास बुलेट ट्रेनमुळे अवघ्या २ तास ७ मिनिटांत पूर्ण होईल, जो सध्या सुमारे ७ तास लागतो.
  • स्टेशन्स: या मार्गावर ठाणे, विरार, बोईसर, वापी, सूरत आणि वडोदरा यासह एकूण १२ स्टेशन्स असतील.
  • वेग: बुलेट ट्रेनचा कमाल वेग ३२० किमी प्रतितास असेल, परंतु ती सुमारे २८० किमी प्रतितास वेगाने धावेल असे अपेक्षित आहे.
  • जापानचे सहकार्य: हा प्रकल्प जपानच्या आर्थिक आणि तांत्रिक मदतीने, शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केला जात आहे. जपान भारताला दोन शिंकानसेन ट्रेन सेट भेट देणार आहे, ज्यामध्ये E5 आणि E3 मालिकांचा समावेश आहे.
  • भविष्यातील योजना
  • या प्रकल्पाचा काही भाग २०२७ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, तर संपूर्ण प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. ही बुलेट ट्रेन सेवा भारताच्या वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवेल आणि रोजगाराच्या संधी, तांत्रिक कौशल्ये, पर्यटन आणि व्यापार यांना चालना देईल अशी अपेक्षा आहे.
  • हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
    छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
    पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button