मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी जवळ डंपर अपघात ; चालक जखमी

रत्नागिरी, दि. 22 मार्च : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील बावनदी( ता रत्नागिरी उताराजवळ रविवारी पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास डंपरला अपघात झाला.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, MH-43 Y 5998 क्रमांकाचा डंपर जयगड येथून मुंबईकडे कोळसा घेऊन जात असताना बावनदी येथील उतारावरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे डंपर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या उतारावर जाऊन पलटी झाला.
या अपघातात अलगुराय (वय 40, रा. पाटणा, बिहार) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी चालकाला तत्काळ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून तात्काळ रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, वेळीच उपचार झाल्यामुळे चालकाचे प्राण वाचले आहेत.
दरम्यान, अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असून, घटनास्थळी हातखंबा पोलीस मदत केंद्र व ग्रामीण पोलीस रत्नागिरी येथील अधिकारी उपस्थित होते. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे,





