ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराष्ट्रीय
मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी साधला राज्यपालांशी संवाद
मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी संवाद साधला.
काश्मिरी युवा गटाच्या मुंबई भेटी दरम्यान या काश्मिरी युवक युवतींनी राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर सबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल, असे राज्यपाल यावेळी म्हणाले.