मुरुड समुद्रकिनारी बांधलेल्या साई रिसॉर्टवर आणखी एक गुन्हा
भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती
दोन महिन्यातील चौथी तक्रार दाखल
दापोली : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी बांधलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यासंदर्भातील आणखी एक तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. भाजपने ते किरीट सोमय्या यांनी या आधीच्या महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री अनिल परब यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून हे रिसॉर्ट बांधले असल्याचा वेळोवेळी आरोप केला आहे.
भाजप भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानुसार अनिल परब यांच्या मुरुडमधील साही रिसॉर्टवर गेल्या दोन महिन्यात चौथा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ट्विटर वर या संदर्भात हे फायर ची प्रत प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. यात म्हटल्याप्रमाणे समुद्राच्या जागी भराव टाकून रिसॉर्ट करत स्वागत कक्ष उभारणे, सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधकाम करणे या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात एफ. आय. आर. दाखल करण्यात आल्याचे श्री. सोमय्या यांनी म्हटले आहे.