मेघराज प्रेमसिंग पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : सौरभ मंगल कार्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथे २२० के. व्हि. उपकेंद्र दोंडाईचा येथील मुख्य तंत्रज्ञ वर्ग दोन मेघराज प्रेमसिंग पाटील यांचा सेवापूर्ती, सन्मान सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणूण सरकार साहेब, जितेंद्रसिंहजी रावल, बापूसाहेब जयदेवसिंहजी रावल उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पियुष शर्मा (मुख्य अभियंता राज्य पारेषण उपक्रम मुख्य कार्यालय प्रकाशगंगा मुंबई) आवर्जून उपस्थित राहिले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाचे उत्सवमुर्ती मेघराज पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल आदराने गौरवोद्गार काढले. त्यांच्या कार्यकर्दीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवर मंडळींचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पर्यावरण संवर्धनाकरिता रोपटे देऊन सत्कार करण्यात आले. त्यानंतर उत्सवमुर्ती मेघराज पाटील व यांच्या सुविद्य पत्नी ललिता यांचासह शाल साडी, पुष्पगुच्छ, भेटवस्तू प्रशंसापत्र सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना मेघराज पाटील यांची सुकन्या दिव्यांनी मुलगा चिरंजीव प्रतिक व छोटासा नातू चिरंजीव जियांश यांनी हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमात आपल्या भावना मनोगत व्यक्त करताना उत्सव मूर्ती मेघराज पाटील यांनी नोकरीतून रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंतचा प्रवास व यशस्वीतेचे रहस्य उलगडले व वेळोवेळी मिळालेले सर्व अधिकारी सह कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच त्यांच्या अंतर्मनातील सल व्यक्त केली कि आजच्या या कार्यक्रमातील कौतुक सोहळा पाहण्याकरिता त्यांचे स्वर्गीय वडील नाहीत. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन योगेश भामरे व कुमारी सेजल काकडे यांनी काव्यात्मक व उत्स्फूर्तपणे करून कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेऊन उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या शेवटी किशोर भामरे यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले व सुरुची स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची विनंती करून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाल्याचे जाहीर केले.