मोफत अन्नदानाचे ‘सुफल आहार’चे कार्य कौतुकास्पद : संगीता पाटील
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/03/img-20230316-wa00236946754445403405577-780x470.jpg)
उरण (विठ्ठल ममताबादे) : कोरोना काळात नागरिकांना भेडसावलेल्या वेगवेगळ्या समस्या, गोरगरिबांचे अन्नासाठी होत असलेले मरण लक्षात घेऊन गोरगरिबांना पोटभर जेवण मिळावे, गोरगरिब जनता उपाशी राहू नये, असा संकल्प करत सारिका पाटील यांनी सुरु केलेला सुफल आहार उपक्रम समाजासाठी उपयुक्त असा उपक्रम असून या उपक्रमातून अनेक गोरगरिबांचे पोट भरत आहे सुफल आहाराचे हे कार्य निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी व आदर्श, कौतुस्कापद आहे असे गौरवोदगार सामाजिक कार्यकत्या संगीता पाटील यांनी काढले
सुफल आहार या उपक्रमाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील मोरा रोडवरील भवरा येथे लहान मुलांना सुफल आहार या संस्थेच्या माध्यमातून मोफत सकस पोषक आहार देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या संगिता पाटील यांनी स्वत: लहान मुलांना जेवण वाढले. यावेळी सदर उपक्रमाचा लाभ समाजातील गोरगरिबांना होत असल्याने सदर उपक्रमाचे संगीता पाटील यांनी कौतूक केले. कोरोना काळापासून झोपडपट्टीतील लहान बालकांना मोफत सकस आहार पुरविले जाते. सारिका पाटील व त्यांची संपूर्ण टीम हे काम निस्वार्थी भावनेने व सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहाने करीत आहेत .संध्याकाळी 7.30 वाजता भवरा येथे सुफल आहारच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी सुफल आहाराच्या संस्थापिका सारिका पाटील , साहिल पाटील, प्रियांका सिंग , सुरज सिंग, विकास शर्मा आदी सुफल आहार टीमचे सदस्य उपस्थित होते.
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/03/img-20230316-wa00236946754445403405577-1024x576.jpg)
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/03/img-20230316-wa00263637718057343285731-1024x576.jpg)