महाराष्ट्रलोकल न्यूज
रत्नागिरीत दुचाकीस्वाराला वाचवताना धावती रिक्षा उलटली

रत्नागिरी : दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना शहरातील माळनाका येथे गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी उलटलेली रिक्षा सरळ केली. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या शाखेसमोर हा अपघात घडला.
रत्नागिरी बस स्थानकाकडून मारुती मंदिरच्या दिशेने निघालेली रिक्षा माळनाका येथे आले असता अनपेक्षितपणे समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी रिक्षाचालकाने धावत्या ब्रेकला अचानक ब्रेक दाबले. या प्रयत्नात रिक्षा जागच्या जागी उलटली. अपघाता वेळी गाडीतून एक दांपत्य प्रवास करत होते. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. अपघातात रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.