महाराष्ट्रराजकीय

रमेश कीर यांना उरण तालुक्यातून सर्वाधिक लीड देण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : रविवार दिनांक २३ जून २०२४ रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ उरण येथील आनंदी हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिवंगत प्रशांत पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या मेळाव्यास शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांनी मार्गदर्शन केले, यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना उरण तालुक्यातून जास्त जास्त लिड देण्याचा निर्धार व्यक्त केला व २६ तारखेला मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहायचे आहे तसेच उरण तालुक्यातील ज्या पदवीधारांची नावे मतदार यादीत आहेत त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सर्व मान्यवरांनी आवाहन केले.

या मेळाव्यास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते एल बी पाटील शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, माजी सभापती नरेश घरत, रमाकांत पाटील, काँग्रेस नेते कमलाकर घरत,अकलाख शिल्लोत्री, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, माजी नगरसेवक बबन कांबळे, उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका श्रीमती सुजाता गायकवाड, काँग्रेस तालुका अध्यक्ष श्रीमती रेखा घरत , शेकाप तालुका अध्यक्ष सीमा घरत, नगरसेविका ऍड वर्षा पाठारे, नायदा ठाकूर, अफशा मुखरी, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, शहर संघटिका मेघा मेस्त्री, विना तलरेजा, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, सुजाता पाटील, अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्ष हुसेना शेख, शहराध्यक्ष मुमताज भाटकर, शाखा संघटिका हसीमा सरदार, रंजना तांडेल, नयना पाटील, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, मधुसूदन पाटील, उपतालुका संघटक के एम घरत, रुपेश पाटील, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, शेकाप शहर चिटणीस शेखर पाटील, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, युवासेना तालुका अधिकारी करण पाटील, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, द्रोनागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, महाविकास आघाडीचे सर्व पक्षांचे सर्व जिल्हा परिषद विभाग वाईज पदाधिकारी शहरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button