राजापूर येथील आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु
रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in; या संकेतस्थळावर जाऊन दि.11 जुलैपर्यत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजापूर यांनी केले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर येथे मॅकेनिकल डिझेल – ४८, शिट मेटल वर्कर-२०, ड्रेस मेकिंग-२० हे एक वर्ष कालावधीचे व्यवसाय आहेत. तर, दोन वर्ष कालावधी करिता वीजतंत्री-Electrician – २० इलेक्ट्रॉनिक्स् मेकॅनिक Electronic Mechanic-२४, प्रशितन व वातानुकूलित टेक्निशियन – Refrigeration & Air Condition Technetion- २४ या व्यसायाकरिता शैक्षणिक पात्रता ही १० वी पास अशी आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरुपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थ्येमध्ये समुपदेशन करण्यात येईल. यामध्ये उमेदवरांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येईल. व्यवसायिक शिक्षण पूर्ण करुन त्वरीत रोजगार/स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त् होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यावेत.
प्रवेशसंबंधी माहिती करिता संपर्क- शिल्पनिदेशक बी.ए. प्रभावळकर – ८७६७०९८३७५, शिल्पनिदेशक एस.एन.मोरजे- ९७६८४८९३८०, शिल्पनिदेशक एस. एन. तळपे -७७७६०३५८८६.