महाराष्ट्रलोकल न्यूजस्पोर्ट्स
राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत स्नेहल पालकर यांना सुवर्णपदक
उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : पाचवी महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धा २०२४ ही स्पर्धा १४ आणि १५ डिसेंबर २०२४ रोजी नाशिक येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर यांनी ३५ वर्षेवरील वयोगट मधील ८०० मीटर आणि १५०० मीटर धावणे या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले तर ५ किलोमिटर धावणे या क्रिडा प्रकारात रौप्यपदक प्राप्त केले.
तसेच त्यांचे सहकारी अमित विचारे सर यांनी ४० वर्षांवरील वयोगट मधील १५०० मीटर धावणे या क्रीडाप्रकारामधे सुवर्ण पदक तर ८०० मीटर धावणे आणि ५ किलोमिटर धावणे यामध्ये रौप्यपदक प्राप्त केले. दिलीप विचारे सर यांनी ५० वर्षांवरील वयोगटात ८०० मीटर आणि १५०० मीटर मध्ये रौप्यपदक प्राप्त केले. तर अमोल वळसंग (API खोपोली) यांनी ३५ वर्षेवरील वयोगट मध्ये १५०० मीटर आणि १० किलोमिटर मधे रौप्यपदक तर ५ किलोमिटर मध्ये कांस्यपदक प्राप्त केले. तसेच मनीष खवले यांनी ५५ वर्ष वरील गटामध्ये उंचउडी मध्ये सुवर्णपदक तर लांबउडी मधे कांस्यपदक प्राप्त केले.
वरील सर्व खेळाडूंची निवड मार्च महिन्यात ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.