राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर उद्यापासून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोटारीने पुणे येथून सावर्डेकडे प्रयाण (कराड-पारण-चिपळूणमार्गे). दुपारी 2 वाजता कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे. दुपारी 3 ते 4 वाजता महिला संघटना बैठक. रात्रौ 9 वाजता एमटीडीसी गणपुतीपुळे येथे मुक्काम.
बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता मोटारीने गणपतीपुळे येथून रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11 ते दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा नियोजन भवन, जिल्हा रत्नागिरी येथे जनसुनावणी. दुपारी 2 ते 2.30 वा. राखीव. दुपारी 2.30 ते 3.30 वा. जिल्हास्तरीय आढावा बैठक. दुपारी 3.30 ते 4 वाजता पत्रकार परिषद. दुपारी 4 वाजता रत्नागिरीकडून सिंधुदुर्गकडे प्रयाण.