ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराष्ट्रीयलोकल न्यूजशिक्षण

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरला दोन सुवर्णपदके

रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित स्पर्धेत रत्नागिरीतील स्वरा साखरकर हिने दोन सुवर्णपदके मिळवली आहेत.

ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा गोवा येथे दि. 12 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडली. देशभरातून नागालँड ते तामिळनाडू आणी पंजाब ते आसाम अशा विविध राज्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी गोव्यामध्ये दाखल झाले होते.
रत्नागिरीची सुवर्णकन्या आणी एस आर के तायकॉन्दो संस्थेची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिची कामगिरी उल्लेखनीय ठरली जिल्हास्तरीय आणी राज्यस्तरीय स्पर्धेत कायम आपला ठसा उमटवणाऱ्या स्वरा हिने राष्ट्रीय स्पर्धेत ही आपला दबदबा कायम ठेवला.

या स्पर्धेत तिने सर्वप्रथम क्युरोगी प्रकारात आक्रमक खेळ करत विरोधी खेळाडूंची धुळधाण उडवत तिने सुवर्ण पदकाची कमाई केली तर पुमसे प्रकारात नागालँडच्या मुलीचा पराभव करत दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

या स्पर्धेसाठी स्वरा हिने अथक मेहनत घेऊन रत्नागिरीचा झेंडा अटकेपार रोवला. आई साक्षी साखळकर तसेच अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणारे आणी SRK तायकॉन्दो क्लब चे मुख्य प्रशिक्षक श्री शाहरुख सर यांचे स्वरा हिलामार्गदर्शन लाभले.
आजपर्यंत स्वरा हिने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणी राष्ट्रीय स्पर्धेत एकूण 52 मेडल मिळवली आहेत.
स्वरा ही दामले शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.तायकॉन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारजगे, महासचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कररा,रत्नागिरी जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायकॉन्डो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत क्लब उपाध्यक्ष अमोल सावंत सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य विरेश मयेकर, निखिल सावंत, कांचन काळे यांनी स्वराचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button