ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
इतर काही गाड्यांना लेट मार्क; करमाळी एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास चार तास रखडली
रत्नागिरी : गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकादरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक काही काळासाठी बाधित झाली. या घटनेमुळे जनशताब्दी एक्सप्रेससह काही गाड्या विलंबाने धावत होत्या
कोकण रेल्वेच्या कुडाळ तसेच सिंधुदुर्ग स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी आले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून याचवेळी या भागातून जाणाऱ्या काही गाड्या थांबवण्यात आल्या. यामध्ये करमाळी ते एलटीटी मार्गावर धावणाऱ्या एसी सुपरफास्ट गाडीचा समावेश होता. सुमारे चार तास उशिराने धावत होती. रेल्वे रुळांवरील पाणी ओसरल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वेची खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली.