लांजाचे माजी सरपंच सुरेश वाघधरे यांचे निधन

लांजा : लांजा गावचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ कलावंत सुरेश पांडुरंग वाघधरे उर्फ बबन दादा यांचे आज सकाळी ११.३० वाजता रविवारी वयाच्या ८५ वया वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
लांजा गाव विकासाच्या प्रक्रियेत दादा वाघधरे यांचा मोठा सहभाग होता. राजकीय पक्षांमध्ये मोठ्या पदावर काम केले सरपंच कालावधीत अनेक विकास कामे मार्गे लावली होती. अनेक वर्ष लांजा गावचे सरपंच होते आदर्श सरपंच म्हणून त्यांची लांजा शहरात उत्तम कामगिरी होती. उत्तम प्रशासक म्हणून प्रसिद्ध होते. लांजा शहरात त्यांचा हॉटेल व्यवसाय होता. लांजा गावातील रंगभूमीवर त्यांनी अनेक नाट्य प्रयोग कलाकार म्हणून आपली कला सादर केली होती. दादा यांचा स्वभाव सरळ मार्गी होता. त्यांच्या दुःखद निधनामुळे लांजा गावातील, शहरातील बुजुरर्ग व्यक्ती हरपल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
लांजा येथील प्रसिद्ध व्यावसायिक माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कोत्रे यांनी सांगितले की, दादा वाघधरे हे उत्तम प्रशासक होते. आम्हाला त्यांच्या कारकिर्दीत काम करण्याची संधी मिळाली. सामाजिक कार्याचे त्यांना मोठे आवड होती. त्यांच्या मागे एक भाऊ, पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.