लांजातील काशीराम जाधव यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुधारक सन्मान पुरस्कार प्रदान
लांजा : महिला आर्थिक विकास महामंडळ वतीने नव तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत ग्रामीण महिलांना प्रगत करण्यासाठी सहकार्य करण्याऱ्या लांजा वेरळ येथील काशिराम जाधव यांना” सुधारक सन्मान पुरस्कार १ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
जेंडर व न्यूट्रीशन या घटकाकरीता वर्ष 2022-23 वर्षाच्या नियोजनाप्रमाणे “Gender Sensitive Role Model Award” या लेखाशीर्षांतर्गत महिला सक्षमीकरणाकरीता संवेदनशील व गावपातळीवर महिलांच्या विकासाकरीता पुढाकार घेत असलेल्या पुरूषांचा सत्कार रत्नागिरी पोलीस परेड ग्राऊंडवर सुधारक सन्मानाने मा. जिल्हाधिकारी श्री देवेदर सिंह आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी श्री जगन्नाथ यांच्या हस्ते
१) श्री काशिनाथ शंकर जाधव गाव :वेरळ ता: लांजा
२) श्री अरविंद गोपाळ जाधव
गाव : तुरल ता: संगमेश्वर
३) श्री विलास गणपत गोरिवले
गाव: गोलप ता: रत्नागिरी या तीन जणांना ग्रामीण भागातील महिला बचत गट याना सहाय्य करण्यासाठी आणि त्यांच्या निःस्वार्थी सामाजिक कार्यासाठी महिला सुधारक हा पुरस्कार देण्यात आला.
वेरळ येथील काशिराम जाधव हे हरहुन्नरी सामाजिक कार्यकर्ते म्हूणून प्रसिद्ध आहेत त्यानी अनेकांना शासकीय योजनांचा गावातील महिला, जेष्ठ नागरिक युवक, अपंग, दिव्यांग यांना लाभ मिळावा, यासाठी पदरमोड करून हरिहिरीने काम करतात. गाव तंटामुक्ती, ग्रामपंचायत, पाणलोट समिती यावर काम केले आहे. स्वतः आदर्श शेतकरी आहेत विविध शेतीचे प्रयोग गावात करून गाव प्रगत करण्यात पुढाकार असतो.