लांजातील नंदाताई बिर्जे यांचा गोशाळेच्या भरीव कार्याबद्दल गौरव

- गोमाता पालन व रक्षण यासाठी गुजरातमधील संस्थेकडून अहिंसा पुरस्कार
लांजा : लांजा बेनीखुर्द येथील श्रीमती नंदाताई बिर्जे यांना गोशाळेच्या भरीव कार्याबद्दल, गोमाता पालन व रक्षण यासाठी त्यांना अहिंसा पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचा हा गौरव कच्छ (गुजरात) येथील भगवान महावीर सं पशु रक्षा केंद्र संस्थेने त्यांचा सन्मान केला आहे.
लांजा येथील श्रीमती नंदाताई बिर्जे यांनी विलवडे, बेनी खुर्द या ठिकाणी गो शाळा उभारणी केली आहे. पोस्ट खात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गो पालन आणि गाईच्या गोमूत्र शेणापासून विविध सेंद्रिय आणि आयुर्वेदिक उत्पादने निर्माण केली आहेत. बेनी खुर्द येथे 102 गायी आणि विलवडे येथे 15 गायी गोशाळेत आहेत. धालिका नंदनवन गोग्राम गोशाळा बेणी खुर्द येथे आहे.
या गोशालेत गोमय भस्म, गोल शेणी, गोवरी, जीवामृत पावडर, गोमूत्र आधी विविध उत्पादने या गोशाळेतून तयार केली जातात. या उत्पादनांना चांगले मागणी असल्याचे श्रीमती नंदाताई यांनी सांगितले. गाय हे चालते फिरते औषधालय आहे. भारतीय संस्कृतीनुसार गाईला मोठे महत्त्व आहे. गोपालनाच्या भरीव कार्याबद्दल बिर्जे यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत