लांजातील विलवडेची सुकन्या भक्ती खामकरचे शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी नामांकन
लांजा : लांजा तालुक्यातील विलवडे गावची सुकन्या कु भक्ती भास्कर खामकर हिचे नेमबाजी क्रीडा प्रकारात अतुलनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र शासनच्या शिवछत्रपती राज्य पुरस्कारासाठी मानांकन झाले आहे राज्य निवड समितीने ही नामांकन जाहीर केली आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील अपेक्षा सुतार आणि आरती कांबळे या खेळाडूंचे देखील पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे.शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे
लांजातील विलवडे येथील कु. भक्ती हिने लांजाचे नाव रोशन केले आहे. भक्तीचे वडील श्री भास्कर खामकर हे विलवडे गावी असून त्यानीं रत्नागिरी लाईव्हला ही आनंदवार्ता सांगुन आपला आनंद प्रकट केला. भक्ती सध्या कोपरगाव डोंबिवली येथे वास्तव्यास आहे. नेमबाजी स्पर्धेत भक्ती तिने आतापर्यंत 4 पदके प्राप्त केली आहेत. मूळ गाव विलवडे येथे कुमारी भक्ती आई वडील ला बरोबर आल्यावर नेमबाजीचा सराव करत असे.
तिच्या या यशात आई बाबा आणि क्रीडा शिक्षक अधिकारी यांचे मोठे योगदान आहे भक्ती हिचे शिक्षण हे मुबंई येथे सुरू आहे राज्य स्तरीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने नेमबाजी त आपले कौशल्य नैपुण्य दाखविले आहे. भक्तीची आई मुबंई पोलीस दलात आहे आई असून ती भक्तीची खरी प्रेरणा आहे. नामांकनासाठी निवड झाल्याबद्दल भक्ती हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे