लांजा तालुक्याचे सुपुत्र, मुंबईस्थित उद्योजक दिलीप बाईंग यांचे निधन
तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील हिरा हरपल्याची भावना
लांजा : तालुक्यातील शिपोशी गावचे रहिवासी आणि मुंबईस्थित प्रतिथयश उद्योगपती आणि सामाजिक, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दिलीप बाईंग यांचे रविवारी पहाटे मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
लांजा तालुक्यातील शिपोशी गावातील सेवाभावी व्यक्तिमत्व असलेले दिलीप बाईंग यांचे तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान होते. आपल्या शिक्षणाच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगले काम केले होते.आपली संस्था जिल्ह्याच्या पटलावर आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. बीएमएस कॉलेज आणून आपल्या कोकणातील मुलांना त्यांनी मॅनेजमेंट क्षेत्रात संधी देण्याचा प्रयत्न केला होता. तालुक्यातील अनेक गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप देखील त्यांच्या माध्यमातून केले जात होते. तसेच दहावी मार्गदर्शन देखील त्यांच्याकडून केले होते. आपल्या गावाविषयी विशेष प्रेम असणारे दिलीप बाईंग गोरगरिबांचा कैवारी म्हणून देखील परिचित होते. दहावी अपेक्षित, दहावी मार्गदर्शन यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले.जहाज बांधणी क्षेत्रात ही त्यांचे योगदान होते
मुंबईस्थित प्रतिथयश उद्योगपती म्हणून परिचित असलेल्या दिलीप बाईंग त्यांच्या निधनाने तालुक्यातील एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व हरवल्याची भावना तालुक्यातून व्यक्त केली जात आहे.